सावित्रीबाई फुले चौकात विविध कार्यक्रम उत्साहात

Foto
 सिल्लोड, (प्रतिनिधी) :  शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. जयंती निमित्त शहरातील सावित्रीबाई फुले चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधत जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे  तालुकाध्यक्ष  सचिन गोरे, शहराध्यक्ष राजेंद्र बन्सोड, उपाध्यक्ष योगेश कुदळ, कार्याध्यक्ष संतोष धाडगे, जिल्हा सचिव नारायण फाळके, मंजीतराव भाग्यवंत, अशोक बनसोड, जगन्नाथ कुदळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या
दुर्गाबाई पवार, शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेविका राजश्री निकम, सुमनबाई अशोक बन्सोड, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर, बबलू पठाण, सुधाकर गायकवाड, इम्रान शेख, शिवा टोम्पे, गौरव सहारे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, कृउबा समितीचे संचालक शेख जावेद, दत्ता वाघ, विशाल प्रशाद, दिलीप वाघ, रत्नाकर वाघ, विलास वाघ, जगदीश बिदवे, सुनील मिरकर, देवराव भाग्यवंत, सुभाष बन्सोड, प्रकाश बन्सोड, पांडुरंग डवणे, सुनील पांडुरंग दुधे, रवी गायकवाड, छाया बन्सोड, भारती बन्सोड, गीता धाडगे, अलकाबाई बन्सोड, लता जाधव, संजय मुरकुटे, अशोक राऊत, संदीप हाडोळे, विलास कुदळ, सुनील बन्सोड, संतोष वाघ, अंकुश बन्सोड, आकाश बन्सोड, सोमिनाथ गौते, मोतीराम राऊत, सुरेश प्रशाद, बाळकृष्ण बन्सोड, राम तसेवाल आदींची उपस्थिती होती.